मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी युती टिकविण्यासाठी फोन केल्याचे सांगण्यात आले. मात्र, शिवसेनेने या वृत्ताचा इन्कार केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव यांना असा कोणताही फोन आलाच नाही, असे म्हटले आहे.
२५ वर्षांची युती टिकविण्यासाठी अमित शहा यांनी फोन करुन आवाहन केले. शहा यांनी फोनवर चर्चा केल्याचे सांगण्यात येत होते. तसा दावा भाजपकडून करण्यात आला होता.
उद्धव ठाकरे यांनी १५१-११९-१८चा फॉर्म्युला मांडला होता. तसा प्रस्ताव भाजपने स्विकारावा, यापेक्षा जास्त जागा देणे शक्य नाही. हा अंतिम प्रस्ताव असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत भाजप नेते जास्त जागांसाठी ठाम राहिलेत. निवडणून न आलेल्या १९ जागांबाबत विचार करण्यात यावा, अशी चर्चा बैठिक झाली. त्याबाबत शिवसेनेला पुन्हा आवाहन करण्याची मोर्चे बांधणी झाली.
मात्र, प्रदेशअध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी यापुढे शिवसेनेशी कोणतीही चर्चा होणार नाही, असा भाजपचा अंतिम निर्णय असल्याचे जाहीर केले. त्यामुळे युती तुटल्यातचे स्पष्ट झालेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.