मुंबई : आता यापुढे शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय झालाय आहे. त्यामुळे सेनेशी चर्चा करणार नाही, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली. त्यामुळे २५ वर्षांची अभेद्य युती संपुष्टात आली आहे. केवळ घोषणा होण्याचे बाकी आहे.
शिवसेना-भाजप युती तुटत असतांनाच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. शहा यांनी उद्धव यांना युती टिकवण्याचं आवाहन केले आहे. असे वृत्त हाती येत असताना मुंबईत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेशी चर्चा नाही, भाजपचा अंतिम निर्णय झालाय,असे सांगितले. त्यामुळे युती तोडण्यात भाजपने पुढाकार घेतल्याचे आता दिसून येत आहे.
शिवसेनेचा भाजपला अखेरचा प्रस्ताव दिला होता. १५१-११९-१८चा नवा फॉर्म्युला होता. शिवसेना ज्या 59 जागांवर निवडणूक जिंकू शकलेली नाही, त्या जागांबाबत शिवसेनेनं विचार करावा. भाजप 19 जागांबाबत विचार करेल, असं अमित शहांनी उद्धव ठाकरेंना सांगितलयं. दरम्यान, युतीबाबत उद्धव ठाकरेंचा निर्णय हा त्यांनी स्पष्ट केला असून त्यापुढे अजून किती वाट पाहायची, असं शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी सांगितले. आता देवेंद्र फडणवीस यांनी युती संपुष्टात आल्याचे स्पष्ट केले. आता युती संपुष्टात आल्याची कोण घोषणा करतो, याकडे लक्ष लागले आहे.
शिवसेना-भाजपची संपुष्टात आली. केवळ घोषणा बाकी आहे. दिल्लीमध्ये भाजपच्या निवडणूक संसदीय बोर्डाची बैठक झाली. यावेळी शिवसेनेने दिलेल्या जागांच्या प्रस्तावावर चर्चा झाली. शिवसेनेनं दिलेला प्रस्ताव नाकारण्यात आला. आज महाराष्ट्राचे निवडणूक प्रभारी ओम माथूर पुन्हा उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते, पण माथूर यांची भेट रद्द झाली असून त्यांच्याऐवजी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे उध्दव ठाकरेंची भेट घेणार होते. त्या आधी शिवसेनेशी आता कोणतीही चर्चा करणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील भाजप नेत्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. त्याला आता दुजोरा मिळत आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.