मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून लैंगिक शिक्षणाचा समावेश केला जाणार आहे.
गेल्या वर्षी विस्तृत चर्चेनंतरही रेगांळलेल्या या महत्त्वपूर्ण विषयाला अखेर, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता यांनी संमती दिली आहे.
त्यानुसार जून महिन्यापासून पालिका शाळांतल्या नववीच्या विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षणाचे धडे दिले जातील. यासाठी महानगरपालिकेकडून आरोग्य विभागाचीही मदत घेतली जाणार आहे.
लैंगिक शिक्षणांतर्गत पौगंडावस्थेत होणारे शारीरिक आणि मानसिक बदल, मासिक पाळी, प्रजनन या मुद्यांवर मार्गदर्शन केलं जाणार आहे.
सोबतच विनयभंग, गर्भपात असे प्रकार रोखण्यासाठी काय करावं, याबाबतही माहिती दिली जाणार आहे.