मुंबई : संसार जस जसं जुना होतो, तसा नवरा-बायकोतले मतभेद कमी होऊन एकमेकांच्या गुणदोष समजून दोघंही पुढे जातात अशी जगाची रीत आहे. पण राज्यातल्या युती सरकारचा संसार जसा जुना होतोय, तसं तसा एकमेकांवर कुरघोड्या करण्याची जणू स्पर्धाच दोन्ही पक्षांमध्ये सुरू झालीय. याचं ताजं उदाहरण खासदार अरविंद सावंताचं विधान ठरलंय.
महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर सध्या खरेदीत गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. भाजपच्या वादग्रस्त मंत्र्यांवर शिवसेनेनं शरसंधान केलंय. झालेल्या आरोपातून निर्दोषत्व सिद्ध होत नाही तोवर या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केलीय असं वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलंय.
गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप होत असताना शिवसेनेनं भाजपला टोला लगावलाय. काँग्रेस - राष्ट्रवादीच्या नेत्यांचे लाखोंचे घोटाळे समोर येत होते. मात्र भाजपच्या मंत्र्यांचे १०० कोटीच्या पुढे घोटाळे समोर येतायत, अशी टीका शिवसेना प्रवक्ते अरविंद भोसले यांनी केलीय. तर दुसरीकडं शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी मात्र शिक्षणमंत्री विनोद तावडेंची पाठराखण केलीय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.