मुंबई : एसटी महामंडळाच्या शिवनेरी बससोबतच आता शिवशाही बसही राज्यातल्या रस्त्यांवर धावणार आहे. या ताफ्यातील पहिली शिवशाही बस मुंबई सेंट्रलच्या डेपोमध्ये आणण्यात आली.
४६ आसनक्षमतेची ही ट्रायल बस केवळ अधिका-यांना दाखवण्यासाठी इथं आणण्यात आलीय. एसटी महामंडळानं अशा प्रकारच्या ५०० बसेस भाडेतत्वावर घेतल्यात. येत्या काही दिवसांतच टप्याटप्यानं त्या रस्त्यावर उतरतील.
पूश बॅक सीट आणि स्लीपर अशा दोन प्रकारात या बसेस असणार आहेत. विशेषत: राज्याच्या ग्रामीण भागात या बसेसची सेवा दिली जाणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९० व्या जयंतीनिमित्त शिवशाही बस लॉन्च केली होती.