मटका किंग भगत हत्येप्रकरणी पत्नीसह सहा दोषी

मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आल आहे. यात भगत याची पत्नी जया आणि मुलगा हितेश यांचाही समावेश आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 27, 2013, 04:12 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी सहा आरोपींना दोषी ठरवण्यात आल आहे. यात भगत याची पत्नी जया आणि मुलगा हितेश यांचाही समावेश आहे.
दोषी ठरलेल्या सहा जणांना सोमवारी त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे. जून २००८मध्ये सुरेश भगतसह सात जणांची हत्या करण्यात आली होती. भगत आणि सात जण कारमध्ये जात असताना, ट्रकनं उडवल्यानं या सातही जणांचा मृत्यू झाला होता. कोट्यवधी रुपयांच्या व्यवसायावर कब्जा करण्यासाठी भगत याची हत्या मुलाने आणि पत्नीने केल्याचा आरोप, त्यानंतर करण्यात आला होता.

मटका किंग सुरेश भगत हत्येप्रकरणी कोर्टाने सुरेश भगतची पत्नी आणि मुलासह सहाजणांना दोषी ठरवलंय. जया भगत, हितेश भगत, किरण आमटे, प्रवीण शेट्टी, सुहास रोगे,हरिश मांडवेकर यांचा यात समावेश आहे.
मुंबईतील मटका किंग सुरेश भगत याचा कोट्यवधीचा मटक्याचा धंदा हा़डप करण्यासाठी त्याची पत्नी जया, मुलगा हितेश आणि सुहास रोगे यांनी सुरेश भगतच्या हत्येचा कट आखला होता..त्यासाठी त्य़ांनी किरण आमटे ,हरिश मांडवेकर आणि प्रवीण शेट्टीला सुपारी दिली होती मात्र सुपारी देतांना एक अट घातली होती .
सुरेश भगत आलीबागहून परतत असतांना वाटेत एका डंपरने त्याच्या वाहनाला जोरदार धडक दिली..त्यामध्ये सुरेश भगतसह सातजणांचा मृत्यू झाला होता..आरोपींनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सुरेश भगतचा का़टा काढला होता..मात्र या अपघाताच्या घटनेपूर्वी सुरेश भगतने आपला घातपात होण्याची भीती व्यक्ती केली होती...यापार्श्वभूमीवर पोलिसांनी डंपरचा चालक आणि मालकाची कसून चौकशी आणि या खूनाचा उलगडा झाला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.