मुंबई : माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय.. त्यांनी पक्ष कार्यालयात आपला राजीनामा पाठवलाय.. पुढील चार ते पाच दिवसांत पुढील दिशा स्पष्ट करणार असल्याचे सूर्यकांता पाटील यांनी सांगितलंय.
राजीनामा देण्याआधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केलाय. राष्ट्रवादीनं आता काँग्रेसमध्ये विलिन व्हावं असा सल्लाही त्यांनी दिला असून राष्ट्रवादीची अवस्था आता विनाशकाले विपरित बुद्धी झाली असल्याची खरमरीत टीका त्यांनी केलीय.
पक्षात ज्येष्ठांचा मान राखला जात नसून लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेची खासदारकी आणि सुनील तटकरेंना प्रदेशाध्यक्षपद कसं काय दिलं जातं असा सवाल त्यांनी विचारलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.