के.शंकरनारायणन यांचा राज्यपालपदाचा राजीनामा

महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बदलीचा आदेश स्वीकारण्याआधी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. के शंकरनारायणन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली होती. या नंतर के शंकरनारायणन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

Updated: Aug 24, 2014, 07:45 PM IST
के.शंकरनारायणन यांचा राज्यपालपदाचा राजीनामा title=

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल के. शंकरनारायणन यांनी बदलीचा आदेश स्वीकारण्याआधी राज्यपाल पदाचा राजीनामा दिला आहे. के शंकरनारायणन यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली करण्यात आली होती. या नंतर के शंकरनारायणन यांनी राज्यपालपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे.

शंकरनारायण यांनी थेट राजीनामाच दिला आहे. अद्याप बदलीसंदर्भातलं कुठलाही आदेश न मिळाल्याचं सांगत बदली झाल्यास पदाचा राजीनामा देईन, अशी भूमिका शंकरनारायण यांनी घेतली होती.  

दरम्यान, गुजरातचे राज्यपाल ओ.पी. कोहली यांच्याकडे सध्या महाष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त पदभार सोपवण्यात आला आहे. आज संध्याकाळी ते महाराष्ट्राचे प्रभारी राज्यपाल म्हणून शपथ घेतील, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.