वृक्षारोपणचा सेल्फी दाखवा आणि अर्धा दिवस सुट्टी मिळवा

झाडांची घटती संख्या लक्षात घेता राज्य सरकार त्यादृष्टीने पाऊल उचलताना दिसत आहे. येत्या एक जुलैला राज्य सरकार दोन कोटी झाडे लावणार आहेत.

Updated: Jun 24, 2016, 09:47 AM IST
वृक्षारोपणचा सेल्फी दाखवा आणि अर्धा दिवस सुट्टी मिळवा

मुंबई : झाडांची घटती संख्या लक्षात घेता राज्य सरकार त्यादृष्टीने पाऊल उचलताना दिसत आहे. येत्या एक जुलैला राज्य सरकार दोन कोटी झाडे लावणार आहेत.

मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल ढासळतोय. यासाठी या पावसाळ्यात राज्य सरकार वृक्षारोपणाची मोहीम हाती घेणार आहे. या मोहिमेत मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभागा घ्यावा असे आवाहनही सरकारने केलेय.

तसेच या मोहिमेस प्रोत्साहन देण्यासाठी जे कर्मचारी झाडे लावतानाचा सेल्फी दाखवतील त्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळणार आहे. म्हणजेच दुपारी एक वाजेपर्यंत हे कर्मचारी कामावर येऊ शकतात. त्यामुळे या मोहिमेला अधिक प्रतिसाद मिळेल अशी शक्यता आहे.