www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
बातमी रेल्वेच्या आरक्षणासंदर्भात. लांब पल्ल्याच्या गाडीतून प्रवास करतांना जर आता तुमच्याकडे यापुढं कन्फर्म तिकीट नसल्यास तुम्हाला प्रवास करता येणार नाही. वेटींग तिकिट असेल तरीही ते ग्राह्य धरणार नाही. त्यामुळे रेल्वेत नो एंट्रीच.
तुमच्याकडे याआधी वेटींग तिकिट ग्राह्य धरून प्रवासाची मुभा दिली जात होती. आता वेटींगच्या तिकीटावर प्रवास करण्यास रेल्वे लवकरच बंदी घालण्याचा घालणार आहे. एवढंच नाही तर वेटींगच्या तिकिटावर प्रवास करण्याऱ्या प्रवाशांना विदाऊट तिकीट म्हणून ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यामुळे अर्ध्या प्रवासादरम्यान तुम्हाला खाली उतरविण्याची सूचनाही तिकीट तपासनीसांना देण्यात आलीय. त्यामुळे वेटींग तिकिट काढू नका आणि प्रवास करू नका, एवढेच सांगणे आहे.
वेटींग तिकीटसाठी जागा उपलब्ध असल्याची खात्री करुनच आता यापुढे प्रवास करता येणार आहे. वेटिंग लिस्टवर अनेक प्रवाशी आरक्षित डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे अशा आरक्षित डब्यातील गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेनं हा निर्णय घेतलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.