मुंबई : हल्ली टक्कलपणा लपविण्यासाठी अनेक जण केसांचा विग वापरतात. मात्र या केसांच्या विगमुळे एका महिलेला तब्बल ३७ हजार रुपये मिळालेत. मुंबईतल्या कांदिवलीमध्ये ही घटना घडलीये.
२००८मध्ये या महिलेने १८ हजार रुपयांना विग खरेदी केला होता. मात्र कंपनीने खराब विग असल्याची तक्रार केली होती. २००८पासून याप्रकरणी कोर्टात केस सुरु होती. अखेर कोर्टाने महिलेला नुकसानभरपाई म्हणून ३७ हजार रुपये देण्याचे आदेश कंपनीला दिलेत.
१३ मे २००८मध्ये तक्रारदार महिलेने खार येथील Berkowits Cosmetic & Skin Clinicमधून विग खरेदी केला होता. तिने स्वत: त्याची निवड केली होती. मात्र जेव्हा तिने विकत घेतला तेव्हा त्यात बिघाड होता.
त्यावेळी तिने याची तक्रार क्लिनिकमध्ये केल्यानंतर क्लिनिकमधील व्यक्तीने तिला थोडे दिवस वापरण्यास सांगितले. त्यानंतरही वापरण्यात अडथळा असेल तर बदलून देऊ असे सांगितले.
तसेच नवीन बदलून हवा असल्यास पाच हजार रुपये एक्स्ट्रा देण्यास सांगितले. त्या महिलेने एक हजार रुपये अॅडव्हान्स दिले. मात्र जेव्हा ती विग घेण्यासाठी पुन्हा गेली असता तिला जुनाच विग देण्यात आला.
याप्रकरणी तिने ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. अखेर आठ वर्षांनंतर याप्रकरणी कंपनीने ३७ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश कोर्टाने दिलेत.