नाशिकमध्ये सेनेत हलचल, बागुल राष्ट्रवादीत

नाशिकमधील शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबईत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 14, 2013, 09:34 PM IST

www.24taas.com,नाशिक
नाशिकमधील शिवसेनेचे माजी आमदार आणि माजी जिल्हाप्रमुख सुनील बागुल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. मुंबईत त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत बागुल यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होण्याची शक्यता आहे. सुनील बागुल यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या विद्यमान जिल्हाप्रमुखांवर टीका केली होती. शिवाय त्यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं बागुल यांची हकालपट्टी केली होती. बागुल य़ांनी पुढील राजकीय वाटचाल राष्ट्रवादीच्या साथीनं करण्याचा निर्णय घेतलाय.
शिवसेनेत गेले काही दिवस पदाधिका-यांची नाराजी वाढू लागलीये. नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल राष्ट्रवादीत जाणार असल्याच्या चर्चेने जोर धरलाय. तर दुसरीकडे कोकणातही शिवसेनेचे माजी आमदार परशुराम उपरकर नाराज आहेत.

उपरकर मनसेत जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांच्या प्रवेशाला तूर्त तरी ब्रेक लागलाय. मात्र, शिवसेनेचे वरिष्ठ नेते उपरकरांची नाराजी दूर करणार की त्यांना दुसरीकडे जाण्याचा मार्ग मोकळा करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.