जमीन खरेदी विक्रीतील फसवणुकीने सुरेश वाडकर व्यथित

जमीन खरेदी विक्री करताना होणा-या फसवणुकीत महसूल यंत्रणाच सहभागी असल्याचा आरोप प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी केला आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jul 14, 2013, 07:41 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
जमीन खरेदी विक्री करताना होणा-या फसवणुकीत महसूल यंत्रणाच सहभागी असल्याचा आरोप प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी केला आहे.
नाशिकमध्ये संगीत अकादमी सुरु करण्यासाठी घेतलेल्या भूखंडात लीटीगेशनमुळे खटला सुरु आहे. अशा व्यवहारांमध्ये नाशिकमधले नामवंत प्रतिष्ठीत, ब्रोकर आणि प्रशासनातील अधिका-यांच्या संगनमताने वाडकरांसारख्या अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. तर अनेक जण उघड्यावर आले आहेत.
गेल्या सात वर्षांपासून लाखो रुपये अडकल्यामुळे व्यथित झालेल्या वाडकरांनी माझ्यासारख्यांचे असे, तर सर्वसामान्यांचे काय, अशी खंत व्यक्त केली. यापेक्षा परदेशात जाऊन राहिलेलं बरं या शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.