www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा दिवस झाले तरीही तपासकार्यात फारशी प्रगती झालेली नाही अशी कबुली स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. मात्र हल्लेखोरांचे काही धागेदोरे हाती आल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
तपासासाठी पोलिसांनी १९ टीम तयार केल्या आहेत. हत्येमागचे खरे सुत्रधार मिळणं गरजेचं आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.
गांधी हत्येमागे जी मानसिकता होती तिच मानसिकता दाभोलकरांच्या हत्येमागे असल्याच्या विधानाचा मुख्यमंत्र्यांनी पुनरूच्चार केला. शिवाय दाभोळकर यांच्या कुटुंबियांची पुन्हा भेट घेणार असून त्यांना आवश्यक ती सर्व मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलीय.
२० ऑगस्ट रोजी काळी ६.३० च्या सुमारास डॉ.नरेंद्र दाभोलकर नेहमीप्रमाणे पुण्यातल्या आपल्य़ा अमेय अपार्टमेंटमधून सकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले. शनिवार पेठेतील पोलीस चौकीकडून ते बालगंधर्वच्या दिशेनं जाणा-या ओंकारेश्वर पुलाकडं वळले..
त्याचवेळी मोटर सायकलवरुन आलेल्या दोन हल्लेखोर त्यांचा पाठलाग सुरु केला..मात्र दाभोलकरांना त्याची खबर नव्हती. हल्लेखोरांनी आपली मोटर सायकल पोलीस चौकी समोर उभी केली आणि पायी चाललेल्या डॉ.दाभोळकरांना हल्लेखोरांनी गाठले. ओंकारेश्वर पुलावर हल्लेखोरांनी अगदी जवळून डॉ. नरेंद्र दाभोलकरांवर पाच राऊंड फायर केले..तीन गोळ्या डॉ.दाभोलकरांना लागल्या..एक गोळी त्यांच्या डोक्यात तर दोन छातीत लागल्या. त्यानंतर हल्लेखोर शांतपणे आपल्या मोटरसायकलकडे आले आणि ते आपल्या मोटरसायकलवरुन रामबाग शाळेच्या दिशेने निघून गेले..
डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज तीन दिवस उलटून गेले तरी पोलिसांच्या हाती कोणतेच धागेदोरे लागले नाही. डॉ.दाभोलकरांचे मारेकरी अद्याप मोकाट कसे असा संतप्त सवाल जनतेकडून विचारला जातोय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.