www.24taas.com , झी मीडिया, लोणावळा, पुणे
राष्ट्रवादीवर नारायण राणे यांनी `प्रहार` केलाय. राष्ट्रवादीकडून कधीही दगाफटका होण्याची भीती उद्यागमंत्री नारायण राणे यांनी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा नव्याने वाद उभा राहण्याची चिन्हे आहेत.
राणेंच्या आरोपानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधला संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्ह आहे. सांगली महापालिका निवडणुकीच्या प्रचारामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी उद्योगमंत्री नारायण राणेंवर टीका केली होती. आता नारायण राणेंनीही राष्ट्रवादीवर थेट तोफ डागलीय.
राष्ट्रवादी कधी दगाफटका करू शकतो असा थेट हल्लाबोल नारायण राणेंनी लोणावळयामध्ये केलाय. असं वक्तव्य करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असलेला आपला अविश्वास पुन्हा एकदा जगजाहीर केलाय. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दगाफटका हीच नारायण राणेंची संस्कृती असल्याचा पलटवार केलाय.
दरम्यान, मागील अनेक दिवस रखडलेली काँग्रेस राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची मीटिंग आज संध्याकाळी होतेय. दोन्ही पक्ष आघाडी एकत्र असले तरी दोन्ही पक्षांमध्ये अनेक मतभेद आहेत. हेच मतभेद निवडणुकीसाठी आणि दोन्ही पक्षांमध्ये आणि सरकार मध्ये समन्वय रहावा यासाठी समन्वय समिती स्थापन करण्यात आलीय.
या समितीची मीटिंग दर महिन्याला होऊन दोन्ही पक्षात मतभेद निर्माण होऊ नये असा प्रयत्न आहे. मात्र मागील अनेक महिने ही मीटिंग झाली नाही. मंत्रिमंडळ मीटिंगमध्ये दोन्ही पक्षातल्या मंत्रालयामध्ये झालेले वाद, जागा वाटपावरुन एनसीपीनं जाहीर केलेला फॉर्म्युला या पार्श्वभूमीवर आजच्या मीटिंगमध्ये वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ