www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
पुणे आणि नाशिकमध्ये विकास आराखड्यावरून प्रचंड वादंग निर्माण झाला असताना आता पिंपरी चिंचवडमध्येही विकास आराखड्याचं राजकारण चांगलंच रंगलंय. नगररचना विभागाच्या उपसंचालक प्रतिभा बदाणे यांनी आराखडा तयार करताना कोट्यावधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनंच केलाय.
पालिकेच्या नगर रचना विभागाच्या उपसंचालिका प्रतिभा बदाणे यांनी बिल्डरधार्जिणा आराखडा तयार करत कोट्यवधींचा मलिदा खाल्याचा आरोप केलाय. पिंपरी-चिंचवडमधल्या ताथवडे भागाचा विकास आराखडा बदाणे यांच्या अध्यक्षेतेखाली नगर रचना विभागानं बनवला. पण तो बनवताना बिल्डरांच्या जमिनीवर आरक्षण न टाकता सर्वसामान्यांच्या जमिनींवर आरक्षण टाकल्याचा आरोप शिवसेनेनं केला होता. आता सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसनंही बदाणे यांना टार्गेट केलंय. एका एकर जागेवर आरक्षण न टाकण्यासाठी बदाणे यांनी ४० लाख घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय.
हा आराखडा सर्वसाधारण सभेत बदलू आणि कुणावरही अन्याय होणार नाही, याची ग्वाही सत्ताधा-यांनी दिलीय. कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप असताना प्रतिभा बदाणे यांनी प्रतिक्रिया देणं तर दूरच पण झी मीडियाची टीम पोहोचण्याआधीच कार्यालय सोडून जाणच पसंत केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.