www.24taas.com, झी मीडिया, पुणे
पुण्यात शिंदेवाडी टेकडीवरच्या अनधिकृत बांधकाम आणि उत्खननाला जबाबदार असणाऱ्या अधिका-यांच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कात्रज शिंदेवाडी टेकडीवरच्या अनधिकृत बांधकामामुळे गेल्या महिन्यात झालेल्या प्रचंड पावसात राडारोडा जमिनीवर आला होता.
या दुर्घटनेत विशाखा आणि संस्कृती वाडेकर या मायलेकींचे बळी गेले होते. तसंच अनेक वाहनं वाहून गेली होती. त्यानंतर प्रशासनाला जाग आली. आज टेकडीवरचं आवैध बांधकाम अखेर जमीनदोस्तक करण्याशत आलं. किसन राठोडनं केलेल्याध या बांधकामामुळे कात्रजच्यान नव्याो आणि जुन्याा बोगद्या ला धोका निर्माण झाला होता. किसन राठोडला पाठीशी घालणा-या पुणे जिल्हा प्रशासनावर टीकेची झोड उठली होती. आखेर पुणे जिल्हाा न्याशयालयाने कारवाईवरची स्थगिती काल उठवताच आज सकाळी मोठ्या पोलीस बंदोबस्तालत या बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
मात्र किसन राठोडच्याय आवैध कामांना पाठीशी घालणा-या महसूल आधिका-यांवर कारवाई कधी होणार ? हा प्रश्नै अजून आनुत्तरित आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.