www.24taas.com, पुणे
महिलांसाठी पहिली शाळा सुरु करणा-या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती साजरी करण्यात आली. मात्र, पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र सावित्रीबाईंना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.
पुण्यातल्या भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा सावित्रीबाईंनी सुरु केली. याच भिडे वाड्यात पुन्हा मुलींचा वर्ग भरवण्यात आला. आणि त्यातून सावित्रीबाईंना श्रद्धांजली वाहण्यात आली. सावित्रीबाईंनी १ जानेवारी १८४८ साली मुलींची पहिली शाळा सुरु केली होती. आज मात्र हा भिडे वाडा मोडकळीस आलाय. ही शाळा जिथे भरायची तिथं घाणीचं साम्राज्य पसरलंय.
मुलींच्या या पहिल्या शाळेच्या इमारतीची दयनीय अवस्था झाली आहे. हा वाडा स्मारक म्हणून घोषित झालाय. मात्र, अजून राज्य सरकार किंवा महापालिकेनं या वाड्याला जतन करण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत.