www.24taas.com , वृत्तसंस्था, मुंबई
टीम इंडियाला महेंद्र सिंग धोनीसारखा कॅप्टन मिळवून देण्यामागेही आपला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. टीम इंडियाचा माजी कॅप्टन राहुल द्रविडनं २००७ साली कॅप्टनसी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर सचिन तेंडुलकरनंच कॅप्टन म्हणून महेंद्रसिंग धोनीचं नाव सुचविल्याचं मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या ब्लॉगमध्ये स्पष्ट केलंय.
शरद पवार म्हणतात, "सचिन नेहमी युवा खेळाडूंना मदत करण्यास अग्रेसर असतो. खेळावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यानं कप्तानपद सोडलं. राहुल द्रविडनंही कॅप्टनसी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्यावर पहिले मी त्याला स्पष्ट नकार दिला होता. कारण लवकरच टी-२० मालिका सुरू होणार होती. तसंच विश्वचषक स्पर्धेसाठीही अवघ्या वर्षभराचा कालावधी राहीला होता.
त्यावेळी राहुलनं सचिनचं नाव कॅप्टन पदासाठी योग्य असल्याचं म्हटलं होतं. सचिननं मात्र याला नकार देत धोनीचं नाव कॅप्टन म्हणून सुचविलं. धोनी उत्तम यष्टीरक्षक आहे परुंतु, तो चांगला कर्णधार होऊ शकेल का? असं विचारल्यावर धोनी उत्कृष्ट कर्णधार होईल असं भाकित सचिननं केलं होतं. त्यानुसार महेंद्रसिंग धोनीला कर्णधार करण्यात आलं आणि धोनीनं भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.