'म्हणून विराट चौथी टेस्ट खेळला नाही'

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराट कोहली धर्मशालामधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट न खेळता विश्रांतीचा निर्णय घेतला, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजनं केला आहे. 

Updated: Mar 27, 2017, 09:20 PM IST
'म्हणून विराट चौथी टेस्ट खेळला नाही'

मुंबई : आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराट कोहली धर्मशालामधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट न खेळता विश्रांतीचा निर्णय घेतला, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजनं केला आहे. रांचीतल्या तिसऱ्या टेस्टवेळी विराट कोहलीच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीतून न सावरल्यामुळे विराटला धर्मशालामधल्या चौथ्या टेस्टला मुकावं लागलं.

५ एप्रिलपासून आयपीएलच्या दहाव्या मोसमाला सुरुवात होत आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. या मॅचमध्ये कोहली खेळला तर ते खूप वाईट दिसेल असंही ब्रॅड हॉज म्हणाला आहे. हॉज आयपीएलची टीम गुजरात लायन्सचा कोचही आहे.