कटक : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरी वनडे शेवटच्या क्षणापर्यंत रोमांचक अवस्थेत होती. कधी सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकत होते तर कधी इ्ग्लंडच्या बाजूने.
शेवटच्या १० चेंडूंवर इंग्लंडला विजयासाठी २८ धावांची आवश्यकता होती. बुमराह गोलंदाजी करत होता. बुमराहने प्लंकेटला एक यॉर्कर टाकला. यावेळी प्लंकेटने लगावलेल्या शॉटवर बुमराहने आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू पकडत सरळ स्टंपवर फेकला आणि नॉन-स्ट्रायकर मॉर्गनला धावचीत केले.
यानंतर धोनीने त्याची इशाऱ्यांमध्ये चांगलीच खिल्ली उडवली. मॉर्गन क्रीझपासून खूप पुढे उभा होता त्यामुळे बुमराहला हातात चेंडू घेऊन धावायला हवे होते आणि स्टंप उडवायला हवे होते.
धोनीने विकेट मिळवण्याच्या आनंदामध्ये बुमराहला यासाठी मजाकमस्तीमध्ये सुनावले. कारण थ्रो जर थोडाजरी चुकला असता तर भारताला सामना जिंकणे कठीण झाले असते. मात्र धोनीने विनोदी शैलीत त्याला हे सांगितले.