मुंबई: झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज विरुद्धच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाची उद्या निवड होणार आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या कृणाल पांड्या आणि करुण नायरची झिम्बाब्वे दौऱ्यामध्ये तर रणजी ट्रॉफीमध्ये खोऱ्यानं धावा करणाऱ्या श्रेयस अय्यरची वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड होऊ शकते.
झिम्बाब्वेविरुद्ध भारत वनडे सीरिज खेळणार आहे, तर त्यानंतर लगेच वेस्ट इंडिजमध्ये 4 टेस्टची सीरिज असणार आहे. झिम्बाब्वेच्या दौऱ्यानंतर भारत 17 टेस्ट खेळणार आहे. त्यामुळे टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला विश्रांतीच मिळणार आहे मग झिम्बाब्वेविरुद्ध धोनीला निवड समिती खेळवणार का विश्रांती देणार हे पाहाण महत्त्वाचं ठरणार आहे. धोनीला विश्रांती दिली तर मात्र अजिंक्य रहाणे कॅप्टन होऊ शकतो. तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी कोहलीच कॅप्टन असेल.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विराट कोहली, रोहित शर्मा, आर.अश्विन आणि शिखर धवन यांना विश्रांती देण्यात येणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.