वर्ल्डकप २०१५ : भारत प्रबळ दावेदार - पाक कर्णधार मिसबाह

पाकिस्तान कर्णधार मिसबाह उल हक याने वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून भारत वर्ल्डकपचा खरा दावेदार असल्याचे मत व्यक्त केले.

Updated: Mar 21, 2015, 02:15 PM IST
वर्ल्डकप २०१५ : भारत प्रबळ दावेदार - पाक कर्णधार मिसबाह title=

अॅडिलेड : पाकिस्तान कर्णधार मिसबाह उल हक याने वर्ल्डकप २०१५च्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवून भारत वर्ल्डकपचा खरा दावेदार असल्याचे मत व्यक्त केले.

ऑस्ट्रेलियाने क्वार्टर फायनलमध्ये पाकिस्तानला हरविले. तसेच भारताने पाकिस्तानला सातत्याने वर्ल्डकपमध्ये धूळ चारली आहे. सहावेळा भारताकडून पाकने पराभव पत्करला आहे. मात्र, मिसबाहने भारतच ऑस्ट्रेलियाला पराभूत करु शकतो, असा दावा केला आहे.

मिसबाहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. आम्हाला स्पिनरची कमतरता भासली. तर ऑस्ट्रेलियाचा भर तेज गोलंदाजीवर आहे. स्पिनरची कमतरता त्यांच्याकडेही आहे. त्यामुळे त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागले. भारत आणि ऑस्ट्रेलिया दोन्ही संघ टांगले आहे. त्यांनी चांगला खेळ केला आहे, असे मिसबाहने म्हटलेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.