मुंबई : २६ मार्चला होणाऱ्या भारत-ऑस्ट्रेलिया सेमीफायनलची उत्सुकता आता शिगेला पोहचलीय. मात्र, सामन्यातील खेळाडूंबरोबरच अंपायर कोण असतील? हेही जाणून घेण्याची उत्सुकता क्रिकेटफॅन्सला लागलीय.
या महत्त्वाच्या सामन्यात श्रीलंकेचे कुमार धर्मसेना आणि ऑस्ट्रेलियाचे रिचर्ड केटलब्रा हे दोघे अंपायरची भूमिका पार पाडणार आहेत. तसेच सामन्याचे रेफ्री श्रीलंकेचे रंजन मधुगुले असतील. २९ मार्च रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी मात्र अंपायर्सची घोषणा अजून झालेली नाही.
सेमीफायनल असणारे अंपायर्स अशाप्रकारे-
24 मार्च : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रीका (ऑकलंड)
डेविड बून (मॅच रेफ्री), इयान गाउल्ड आणि रोड टकर (अंपायर), नाइजेल लांग (थर्ड अंपायर) आणि ब्रूस ऑक्सेनफोर्ड (फोर्थ अंपायर)
26 मार्च : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (सिडनी)
रंजन मधुगुले (मॅच रेफ्री), कुमार धर्मसेना आणि रिचर्ड केटलब्रा (अंपायर), मराईस इरासमस (थर्ड अंपायर) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (फोर्थ अंपायर)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.