नवी दिल्ली : WWE मध्ये प्रथम एका भारतीय व्यक्तीने एंट्री मारली होती. तो व्यक्ती होता द ग्रेट खली. पण हा खली एका मॅच दरम्यान जखमी झाला आहे. उत्तराखंड येथे एका रेसलिंग दरम्यान त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला आयसीयू मध्ये भरती करण्यात आला आहे.
२४ तास खली हा डॉक्टरांच्या निगरानी खाली राहणार आहे. सध्या त्याला आरामाची गरज असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. खलीच्या डोक्याला मार लागला असून त्याची मान आणि छातीला देखील दुखापत झाली आहे. त्याच्या पाठिच्या कणाला देखील काही प्रमाणात दुखापत झाली आहे.
खली याला मॅच दरम्यान ३ विदेशी रेसलर्स करून मारहाण झाली. खली याला खूर्चीने देखील मारहाण झाली त्यानंतर तो अधिक जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं.