www.24taas.com, झी मीडिया, सेऊल
नोकियाने 4G वर असा स्पीड मिळणार आहे, ज्यात ५ जीबीचा चित्रपट ११ सेकंदात डाऊनलोड होणार आहे. नोकियाचा हा स्पीड भारतातील 4G च्या स्पीडच्या ४०० पट अधिक आहे. नोकियाने हा स्पीड दक्षिण कोरियाची कंपनी एस के टेलिकॉममुळे मिळाली आहे.
नोकियाने म्हटले की, नोकिया आणि एसके टेलिकॉमने 3.78 जीबी/सेकंड (Gbps)पर्यंत स्पीड उपलब्ध आहे. या स्पीडवर कोणताही मोबाइल ब्रॉडबँड यूझर 5 जीबीचा एचडी क्वॉलिटीचा चित्रपट केवळ 11 सेकंदात डाउनलोड करू शकतो.
या स्पीडवर 650-750 एमबीचा कोणताही बॉलीवूडचा चित्रपट केवळ एका सेकंदात डाऊनलोड होऊ शकतो.
एयरटेलच्या वेबसाइटनुसार, भारतात आयफोन 5S आणि आयफोन 5C वर 4G वर 10 एमबी/सेकंड (Mbps) पर्यंत स्पीड मिळतो. या संदर्भात विडियोकॉन टेलिकॉमने सांगितले की, ते सुद्धा 4G वर इतका स्पीड देतात. या तुलनेत नोकियाचा स्पीड 400 पट अधिक असणार आहे.
नोकिया आणि एसके टेलिकॉमने हा स्पीड मिळविण्यासाठी स्पेक्ट्रमच्या 200 मेगाहर्त्ज साठी 10 स्पेक्ट्रम फ्रीक्वेंसीज़ला एकत्र दिले आहे. हा स्पीड भारतात 2010 मध्ये कंपन्यांना देण्यात आलेल्या ब्रॉडबँड वायरलेस स्पेक्ट्रमच्या 10 पट अधिक आहे., याचा वापर 4G साठी केला जातो.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.