www.24taas.com, वॉशिंग्टन
अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा हिने क्युरिऑसिटी रोव्हरने आणलेले मंगळ ग्रहावरील खडकांचे नमुने तपासले आहेत. यावरून मंगळ ग्रहावर पूर्वी सूक्ष्मजीवांचं अस्तित्व असल्याचे पुरावे मिळत आहेत.
क्युरिऑसिटी रोव्हर पाठवण्यामागे नासाचा मुख्य हेतू हा होता, की मंगळावर कधी जीवसृष्टी होती का? या प्रश्नाचं उत्तर हो असं मिळालं आहे. क्युरिऑसिटी रोव्हरने मगळावरील खडकांना छिद्र पाडून तपासणी केल्यावर त्याच्या भुकटीमध्ये सल्फर नायट्रोजन, हायडड्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस आणि कार्बन असल्याचं समोर आणलं. ही सर्व मूलतत्व जीवसृष्टीसाठी आवश्यक असतात. ज्या अर्थी मंगळावर ही जीवनतत्व आहेत, त्या अर्थी मंगळावर कधी काळी जीवसृष्टी असावी.
जर मंगळावर ही सर्व जीवनावश्यक तत्व असतील, तर मंगळावर मनुष्य जीव राहू शकेल असं वातावरण निर्माण करता येणं शक्य आहे. याच गोष्टीचा वेध घेण्यासाठी नासाने क्युरिऑसिटी रोव्हर नामक सहाचाकी रोबोट मंगळावर पाठवला. अशा प्रकारचा हा पहिलाच रोबोट आहे ज्याला अंतराळात पाठवण्यात आलं आहे.