मुंबई : शॅमिलिऑन सरड्यासारखी तुमची कार रंग बदलायला लागली तर, काय धमाल येईल ना. पण असं शक्य आहे का?, हो असं शक्य असल्याचं समोर आलंय, कारचे रंग सरड्यासारखे बदलण्यामागे कोणताही मांत्रिक नाहीय, तर हे सर्व तांत्रिक आहे. ही तंत्रज्ञानाची कमाल आहे.
(रंग बदलणाऱ्या कारचा व्हिडीओ पाहा, बातमीच्या सर्वात खाली)
या टेक्नॉलॉजीनुसार, तुमच्या कारचा रंग कोणता असावा, तो कसा एका झटक्यात बदलता येईल, तुमच्या मनाप्रमाणे कारचा रंग बदलण्याचा कंट्रोल तुम्हाला तुमच्या मोबाईल फोनमध्ये, अथवा ड्रायव्हरकडे घेता येणार आहे.
नेमकं काय आहे तंत्रज्ञान?
प्रिझम आकारातील मेटॅलिक पिगमेंट रोटेट बेसवर फिरतात, आणि व्हॉल्टेजच्या फ्रिक्वेन्सीवर तुमच्या कारचा रंग बाहेरून, सरडयासारखा बदलतो. या तंत्रज्ञानामुळेच तुमच्या कारचा रंग बदलतो. हा रंग एक नाही दोन नाही, तर दहा-दहा पेक्षा जास्त प्रकारात बदलतो. व्हिडीओ पाहा तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.