अबब! २२ करोड रुपयांचा हा कम्प्युटर

अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही... ‘अॅपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स यानं बनवलेला हा पहिला वहिला कम्प्युटर...

Updated: Dec 16, 2014, 08:01 AM IST
अबब! २२ करोड रुपयांचा हा कम्प्युटर title=

न्यूयॉर्क : अवाढव्य आकारात दिसणारा हा कम्प्युटर काही साधा-सुधा कम्प्युटर नाही... ‘अॅपल’चा निर्माता स्टीव्ह जॉब्स यानं बनवलेला हा पहिला वहिला कम्प्युटर...

नुकताच हा कम्प्युटर विकला गेलाय. ३६ लाख डॉलर्सला (म्हणजेच, जवळपास २२ करोड रुपये) हा कम्प्युटर विकला गेलाय. आपल्या करिअरच्या सुरुवातीला स्टीव्हनं हा कम्प्युटर डिझाईन केला होता. 

‘क्रिस्टी’कडून आयोजित करण्यात आलेल्या लिलावात अॅपल-१ मॉडलच्या ५० दुर्मिळ कम्प्युटर्सवर बोली लावण्यात आली. यातील एका कम्प्युटरवर अमेरिकेच्या एका व्यक्तीनं ३६.५ लाख डॉलर्सहून जास्त बोली लावली. 

मिळालेल्या माहितीनुसार, जॉब्सनं १९७६ मध्ये कॅलिफोर्नियाच्या पालो ऑल्टोमध्ये आपल्या गॅरेजमध्ये एक कम्प्युटर बनवला होता. हा कम्प्युटर त्याचा कौटुंबिक मित्र चार्ली रिकेट्सनं ६०० डॉलर्सला (जवळपास, ३७ हजार ५८७ रुपये) विकत घेतला होता.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.