चेन्नई : एक गालगुच्चा एवढा महागात पडणार असेल, तर यापुढे कितीही संताप आला तर मुलांचा गालगुच्चा घेऊ नका, कारण एका विद्यार्थ्याला शिक्षा करताना त्याचा गालगुच्चा घेणे शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे. उच्च न्यायालयाने शिक्षिकेला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
चेन्नईमधील केसरी शाळेमध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थ्याला शिक्षा केली होती. शिक्षा करताना त्याचा गालगुच्चा ओढला होता. याबाबतची माहिती विद्यार्थ्याने त्याच्या आईला दिली होती. आईने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. मानवाधिकार आयोगाने शाळेच्या प्रशासनाला एक हजार रुपयाचा दंड ठोठावला होता.
विद्यार्थ्याची आई शाळेमध्ये दंडाची रक्कम घेण्यास गेली होती. शाळेच्या प्रशासनाने त्यांना त्रास देण्यास सुरवात केली. याबाबत उच्च न्यायालयाकडे तक्रार दाखल केली. उच्च न्यायालयाने शिक्षिकेला 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.