नवी दिल्ली : ऑनलाईन जगतानं व्यावसायाचे अनेक मार्ग आणि अनेक संधी खुल्या केल्या असं म्हणायला हरकत नाही... कारण, आजकाल सर्व वस्तू 'ऑनलाईन' विकत मिळतंय... अगदी गाईचं शेणही!
कपडे, बूट, खेळणी, पुस्तकं आणि आता गाईचं शेणही... ऑनलाईन विकत मिळतंय. परंतु, गाईच्या शेणाचे ऑनलाईन खरेदीदार किती आहेत हे येणारा काळच सांगू शकेल.
अधिक वाचा - '24 तास डॉट कॉम'चा अॅप डाऊनलोड करा, जिंका दररोज १ मोबाईल
गावात मातीच्या घरांना शेणानं सारवलं जातं. शेणाचा अध्यात्मिक वापरही होतो. धार्मिक कार्यांतही शेण उपयोगी येतं. अशा वेळी संपूर्ण परिसर शेणानं सारवल्यानं ती जागा पवित्र होते, असा समज आहे.
गाईच्या शेणानं हवनकुंड पेटवलं जातं. शिवाय, मनुष्याच्या अंतिम विधीमध्येंही शेणाचा वापर जाळण्यासाठी केला जातो. हेच गाईचं शेण आता amazon.in या वेबसाईटवर ऑनलाईन विकताना दिसतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.