मुंबई : दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंग आपल्या प्रतिस्पर्धी अॅपलच्या आयफोनला टक्कर देण्यासाठी दोन नवीन फोन बाजारात आणणार आहे. हे दोन्ही प्रिमियम सेगमेंटचे हँटसेट असणार आहेत. दिवाळीपूर्वी हे फोन बाजारात येण्याची शक्यता आहे.
सॅमसंग दोन नवीन हँडसेट गॅलेक्सी अल्फा आणि गॅलेक्सी नोट ४ आणणार आहेत. हे दोन्ही फोन आयफोन ६ आणि आयफोन ६ प्लसला टक्कर देणार आहे. यातील गॅलेक्सी अल्फाची बॉडी मेटलची असणार आहे. कंपनीने याबाबत आपल्या डिलर्स आणि रिटेलर विक्री करणाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. आयफोन ६ हा येत्या १७ ऑक्टोबरला भारतात येणार आहे. त्यामुळे सॅमसंग त्यापूर्वीच आपले दोन प्रिमीयर हँडसेट लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.
सॅमसंग आयफोन ६ चा सामना करण्यासाठी खास करून ४.७ इंचाच्या स्क्रिनमध्ये नवीन फोन आणणार आहे. यात आयफोन पेक्षा अधिक फिचर असणार आहे. तसेच आयफोनपेक्षा याची किंमत कमी असणार आहे. एका अंदाजानुसार याची किंमत ४० हजाराच्या आसपास असणार आहे. तर आयफोनची किंमत यापेक्षा अधिक असणार आहे.
सॅमसंगने हा फोन बाजारात आणण्यापूर्वी ट्वीट केले आहे. तसेच अॅपलची चेष्टाही केली आहे. यात स्टीव जॉब्सच्या त्या वक्तव्याचा हवाला दिला की मोठ्या स्क्रिनचा फोन कोणी खरेदी करणार नाही. सॅमसंगने विचारले की आता आयफोन ६ बाबत विचार कसा बदलला.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.