मुंबई : आपण टाकलेला कचरा किती क्रूरपणे एखाद्या जीवाला हानी पोहचवू शकतो, हे दाखवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वायरल झालाय.
प्राणीमित्रांच्या एका ग्रुपला समुद्रात सापडलेल्या एका कासवाच्या नाकात घुसलेलं काहीतरी आढळलं. या कासवाच्या नाकाच्या डाव्या नाकपुडीत घुसलेल्या या वस्तूमुळे त्याला श्वास घेतानाही त्रास होत होता. त्यामुळे या ग्रुपनं ही गोष्ट त्याच्या नाकातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा हा कासव रक्तबंबाळ झाला पण, नळीसारखी दिसणारी ही वस्तू काही निघाली नाही. त्यामुळे, या ग्रूपनं ही वस्तू मधून कापली... आणि पाहिलं तर त्यांना धक्काच बसला...
कारण, ही वस्तू होती... आपण ज्युस पिण्यासाठी वापरतो ती प्लास्टिकची नळी... पण, या नळीनं मात्र या कासवाचा जीव घेण्याचा प्रयत्न केला होता.
हे पाहून या ग्रुपनं मग ही नळी संपूर्णत: कासवाच्या नाकातून काढण्याचा निर्णय घेतला... आणि त्यांनी हे करूनही दाखवलं... हे करत असताना कासवाला होणाऱ्या वेदना तुमच्या संवेदनांनाही आव्हान देऊ शकतं.
त्यानंतर या ग्रुपनं कासवाच्या जखमेवर योग्य ते उपचार करून त्याला पुन्हा समुद्रात सोडून दिलं.
तुमच्या मनाची तयारी असेल तरच हा व्हिडिओ पाहा...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.