स्वित्झर्लंड : तुम्हांला कपडे धुवायचे असेल तर हाताने किंवा वॉशिंग मशीनबद्दल विचार करतात. पण आता असे एक डिव्हाइस आले आहे की त्याने तुमचे कपडे धुतले जातील आणि त्यासाठी हाताने रगडपट्टी किंवा वॉशिंग मशीन चालविण्याची गरज नाही.
साबणासारख्या छोट्या आकाराच्या या डिव्हाइसचे नाव आहे डॉल्फी... या डिव्हाइसच्या साहय्याने तुम्हांला आता कपड्यांचा मळ काढण्यासाठी हातांची गरज पडणार नाही.
या डिव्हाइसच्या वापर करण्यासाठी एका बादली किंवा डबमध्ये पाण्यात कपडे टाकून थोडी डिटर्जंट पावडर टाकायची आहे. त्यानंतर हे डिव्हाइस ऑन केल्यावर त्याचा अल्ट्रासॉनिक टेक्नॉलॉजीद्वारे कपड्यातील सर्व मळ निघून जातो.
कसे काम करते हे डिव्हाइस
डॉल्फी टॉयलेट सोपच्या आकाराचे एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. ते अल्ट्रासॉनिक साउंडवेव्स रिलीज करते. पाणी आणि डिटर्जंटच्या मिश्रणात टाकून हे डिव्हाइस ऑन केल्यावर याचे ट्रान्सड्युसर फेस बनवितात. त्यात हाय प्रेशर बबल्स तयार होतात. हे बबल्स कपड्यांच्या मळाला धडक देऊन त्यांना ढिले करतात आणि मळ कपड्यांपासून वेगळा होतो.
याचा आकार खूप छोटा आणि हँडी आहे. याचा वापर घरासह प्रवासातही करता येतो.
या डिव्हाइसने कॉटन, सिल्क, वुलनसह सर्व प्रकारचे कपडे स्वच्छ करता येतात.
पाहा हा व्हिडिओ -
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.