मुंबई : सोशल मीडियावर सध्या आघाडीचे अॅप हे व्हॉट्सअॅप आहे. मात्र, whatsappचा डिलीटेड डेटा हा मोबाईलमध्येच असतो. त्याचा गैरवापर होण्याची भिती व्यक्त करण्यात आहे.
IOS मोबाईलवर व्हॉट्सअॅप वापरत असाल तर एक नवीन अपडेट आहे. तुम्ही वापरत असलेल्या व्हॉट्सअॅप वरील चॅट कायमस्वरूपी डिलीट होत नाही, अशी माहिती पुढे आली आहे.
डिलीट केलेली माहिती मोबाईल फोनमध्ये स्टोअर केली जाते. अॅपल ऑपरेटिंग सिस्टिमच्या एका तंत्रज्ञाने ही माहिती ब्लॉग पोस्टवर उघड केली आहे. डिलीट केलेली ही माहिती पुन्हा मिळवणे शक्य आहे; पण व्हॉट्सअॅप वर साठवली जाणारी माहिती सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहे.
दरम्यान, हा सारा प्रकार व्हॉट्सअॅप कोणत्याही हेतूसाठी करत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. व्हॉट्सअॅपच्या बाबतीतील हा प्रकार केवळ आयओएस अॅप्सलाच येत असल्याने काळजी करण्याचे कोणतेही कारण नसल्याचेही त्यांनी म्हटलेय.