Todays Panchang : आज मंगळवार. नवा दिवस आणि तितक्याच नव्या संधी. अतिशय सकारात्मकतेनं आजच्या दिवसाची सुरुवात करत काही खास कामं करण्याचा बेत तुम्ही आखू पाहताय का? हा दिवस तुमच्यासाठी अतिशय खास असेल यात चिंताच नाही. पण, तरीही आजच्या दिवसातील योग आणि तिथी एकदा पाहूनच घ्या.
बऱ्याचदा राशीभविष्य पाहिल्यानंतर आपण पंचांग पाहणं विसरतो किंवा अजाणतेपणानं टाळतो. पण, असं न करता दैनंदिन पंचांग पाहिल्यास शुभ मुहूर्तांपासून अशुभ काळापर्यंतची संक्षिप्त माहिती तुम्हाला मिळू शकते. चला पाहुया आजचं पंचांग.... हे पंचांग तुम्हाला शुभ मुहूर्त, अशुभ काळ, चंद्रोदय, सूर्योदय, योग, तिथी या साऱ्याची माहिती देणार आहे. (14 march 2023 tuesday todays panchang mahurat latest astro news in marathi )
आजचा वार - मंगळवार
तिथी- सप्तमी
नक्षत्र - अनुराधा
योग - वज्र
करण- विष्टि, भाव
सूर्योदय - सकाळी 06:32 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.28 वाजता
चंद्रोदय - दुपारी 01.15 वाजता
चंद्रास्त - सकाळी 10:33 वाजता
चंद्र रास- वृश्चिक
दुष्टमुहूर्त– 08:55:55 पासुन 09:43:39 पर्यंत
कुलिक– 13:42:19 पासुन 14:30:03 पर्यंत
कंटक– 07:20:27 पासुन 08:08:11 पर्यंत
राहु काळ– 15:29:43 पासुन 16:59:13 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 08:55:55 पासुन 09:43:39 पर्यंत
यमघण्ट–10:31:23 पासुन 11:19:07 पर्यंत
यमगण्ड– 09:31:43 पासुन 11:01:13 पर्यंत
गुलिक काळ– 12:30:43 पासुन 14:00:13 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:06:51 पासुन 12:54:35 पर्यंत
ताराबल - ज्येष्ठा, मूळ, उत्तराषाढ़ा, धनिष्ठा, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, अश्विनी, कृत्तिका, मृगशिरा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, माघ, उत्तरा फाल्गुनी, चित्रा, विशाखा, अनुराधा
चंद्रबल- वृषभ, मिथुन, कन्या, वृश्चिक, मकर, कुंभ
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)