Astro News: असं म्हणतात की (vastu shahstra rules) वास्तू कायम तथास्तू म्हणत असते. त्यामुळं तुम्ही ज्या ठिकाणी राहता ते घर लहान असो किंवा मोठं, त्यामध्ये (Positive vibes) सकारात्मकता कायमद नांदत ठेवावी. कारण, ही वास्तूच तुम्हाला जीवनात पुढे नेण्याचं काम करत असते. तुम्हाला माहितीये का घराचा प्रत्येक कोपरा वास्तूच्या नियमांनुसार महत्त्वाचा असतो. स्वयंपाकघरही त्यातीलच एक. इथं असणारी प्रत्येक वस्तू तुमच्या प्रगतीमध्ये हातभार लावत असते. यामध्येच जर तुमच्याकडे एखादा तवा असेल तर तो नशीब पालटण्याचं काम करु शकतो. पण, त्या तव्याची काळजी घेतली जाणंही तितकंच महत्त्वाचं. आता या तव्याची काळजी कशी घ्यावी ते एकदा पाहाच...
- उष्ट्या भांड्यांमध्ये तवा कधीच ठेवू नका. सर्व भांडी स्वच्छ करण्यापूर्वी किंवा सर्व भांड्यांनंतर तवा स्वच्छ करा. तुटलेला तवा कधीच वापरू नका.
- तवा स्वच्छ करण्यासाठी कधीच धारदार गोष्टीचा वापर करत असाल, तरतसं करू नका. लिंबू आणि मीठाचं मिश्रण करून त्यानं तवा स्वच्छ करा. अशानं तवाही चमकेल आणि तुमचं नशीबही.
- तव्यावर कधीच उष्ट अन्न गरम करू नका. त्यावर मांस, अंडी किंवा मासेही तळू नका. मांसाहाराची (non veg food) भांडी वेगळी ठेवा.
- राहूला ज्योतिषविद्येमध्ये पाप ग्रह मानलं जातं. तो मांसाहार, क्रूरता, लालसा, वाईट संगत, संताप आणि अपशब्दांचा धनी असतो.
- ज्योतिषामध्ये सांगितल्यानुसार कधीच गरम तव्यावर पाणी शिंपडू नका. अशानं होणाऱ्या आवाजामुळं आयुष्यातील सुखशांती नाहीशी होते.
- तुम्ही तवा ठेवतानाही काळजी घ्या. तवा कधीच उपडा ठेवू नका.तो स्वयंपाकघरात उभा करून दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवा. जेणेकरून त्याच्यावर वारंवार कुणाची नजर जाणार नाही.
- जेवण झाल्यानंतर काहीतरी शेगडीखाली सरकवून ठेवण्याची आपली सवय असते. पण, तसं करु नका. थंड होताच तो स्वच्छ करून एका जागी ठेवा.
- भरभराटीसाठी तव्यावर शेकलेली सर्वात पहिली चपाती/ भाकरी पशु पक्षांसाठी ठेवा. चपाती किंवा भाकरी करण्याआधी तव्यावर एक चिमुटभर मीठ टाका. असं केल्यानं राहू आणि शनि शांत होतात.
आता ही बाब प्रत्येकाच्या विश्वासावर आधारित आहे, की तुम्ही ज्योतिषविद्येवर किती अवलंबून राहता. एकिकडून पाहिलं तर घरातील लहानसा चमचा ते अगदी पोलपाट लाटणंसुद्धा वास्तूच्या सुखासाठी महत्त्वाचं असतं. पण, धकाधकीच्या आयुष्यात सर्वांनाच या गोष्टी लक्षात ठेवता येतात असं नाही. पण, याचा अर्थ तुम्ही संकटांचे धनी व्हाल असाही नाही.
(वरील माहिती सर्वसामान्य संदर्भांतून घेण्यात आलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)