मुंबई : नवरा बायको यांचं जीवन हे भाग्याचं लक्षण आहे. ज्या लोकांचं वैवाहिक आयुष्य चांगलं असतं त्यांचं संपूर्ण आयुष्य आनंदात जातं. यासाठी महत्त्वाचं आहे, ते पती-पत्नीचं एकमेकांवरचं प्रेम आणि सन्मान. पती आणि पत्नी दोघांमध्ये समजूतदारपणा असणं गरजेचं आहे.
आचार्य चाणक्य यांनी कूटनीती, राजकारण, अर्थशास्त्राप्रमाणे व्यक्तीच्या व्यवहारिक जीवनाविषयी देखील महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीशास्त्रात पती-पत्नीने काही चुका टाळल्या पाहिजे असं सांगितलं आहे. त्यानुसार जाणून घेऊया काय म्हटलंय चाणक्य नीतीत…
पती आणि पत्नीने या चुका करू नये
नवरा बायको यांच्यामध्ये अनेक गोष्टींबाबत गोपनीयता ठेवली पाहिजे. दोघांमधील गोष्टी इतरा कोणालाही सांगू नये. दोघांमधील गोष्टी इतरांना सांगणं म्हणजे अपमानास्पद मानलं जातं. त्यामुळे दोघांमधील नात्यातील गोष्टी गुप्त ठेवा.
पती आणि पत्नीत एखाद्या गोष्टीवरून वाद होणं साहजिक आहे. मात्र रागाच्या भरात एकमेकांना अपशब्द वापरत अपमान करणं चुकीचं आहे. असे केल्यास वैवाहिक जीवनाचा पाया कमकुवत होतो. त्यामुळे राग करणं शक्यतो टाळा.
पती आणि पत्नी यांचं नातं विश्वासावर टिकून आहे. एकमेकांशी खोटं बोलणं पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनात दरी निर्माण करू शकते. खोटं बोलण्यामुळे नातं संपुष्टात देखील येऊ शकतात.
आपल्या आणि कुटुंबाच्या सुख-सुविधेसाठी खर्च करणं चांगली गोष्ट आहे. परंतु अनावश्यक खर्च आर्थिक अडचणीत नाही तर पती-पत्नीमधील भांडणास देखील कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्च टाळावा.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याचं समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)