मुंबई : रात्री झोपल्यानंतर अनेकांना स्वप्न पडतात. काहींना भीतीदायक तर काहींना खुप चांगली स्वप्न पडतात. यातील काही माणसांना रात्री स्वप्नात प्राणी दिसतात. हे प्राणी स्वप्नात दिसण्याचा अर्थ काय असतो? या प्राण्यांचा आयुष्यात काय फायदा होतो? हेच जाणून घेऊयात.
पांढरा सिंह
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पांढरा सिंह दिसला तर त्याचा अर्थ असा होतो की, तो आपल्या शत्रूंवर सहज विजय मिळवू शकतो. याशिवाय न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळण्याची ही चिन्हे असतात. तसेच पांढरा सिंह पाहण्याचा असाही
अर्थ असतो की, तुम्ही आयुष्यात खुप सकारात्मक आहात आणि आपले जीवन शांतपणे जगत आहेत.तसेच तुमची सतत प्रगती होतेय.
पांढरा हत्ती
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पांढरा हत्ती दिसला तर याचे अनेक संकेत असू शकतात. उदाहरणार्थ, तुम्ही त्यावर बसला असाल, तर तुमचा राजयोग सुरू होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या स्वप्नात फक्त पांढरा हत्ती दिसला तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत किंवा तुम्हाला चांगली नोकरी मिळू शकते.
पांढरा साप
रात्री झोपताना जर तुम्हाला स्वप्नात पांढरा साप दिसला तर याचा अर्थ असा की तुमचे नशीब लवकरच खुलणार आहे. या स्वप्नाबद्दल असेही सांगितले जाते की पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
पांढरा हंस
जर स्वप्नात पांढरा हंस दिसला तर याचा अर्थ तुमच्या घरात काही शुभ कार्य होणार आहे. इतकेच नाही तर ते अमाप संपत्ती मिळविण्याचे संकेत देते. स्वप्नात पांढरा हंस दिसणे खूप शुभ असते. हे जीवनात आनंदाचे कोणतेही संकेत दर्शवते.
पांढरा मोर
जर तुम्हाला स्वप्नात पांढऱ्या रंगाचा मोर दिसला तर ते खूप शुभ मानले जाते. तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही.)