Holika Dahan 2023 Upay in marathi : गुलाबी, लाल, हिरवा आणि निळा अशा अनेक रंगाची उधळण करणारा सण म्हणजे धुलिवंदन किंवा धुळवड (Dhulivandan / Dulwad). असं म्हणतात की या होळीमधे वाईट गोष्टींचा नाश होतो. समाजातील वाईट परंपरा जाळण्याचा संदेशही होळी देते. वाईटातून नेहमीच चांगलं निर्माण करण्यासाठी वाईट प्रवृत्ती नष्ट केल्या जातात. अशात आर्थिक अडचणीवर मात करायचं असेल तर होळीच्या दिवशी ज्योतिषशास्त्रात (Astro tips) काही उपाय सांगण्यात आले आहेत. होळी सोमवारी 6 मार्च 2023 ला आहे. त्यादिवशी खालील दिलेले उपाय करा आणि चमत्कार बघा. (Holi 2023 Money Upay remedies Astro tips in marathi)
1. होळीच्या दिवशी संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर लाल गुलाल शिंपडा आणि पिठाच्या दोनमुखी दिव्यात मोहरी तेलाचा दिवा लावा.
2. घरात कोणी आजारी असेल तर हा उपाय करावा. मूठभर पिवळी मोहरी, एक लवंग, काळे तीळ, तुरटीचा छोटा तुकडा आणि एक कोरडे खोबरे त्या आजारी माणसावरुन 7 वेळा उलटून ते होळीमध्ये भस्म करा.
3. आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी होळीजवळ देशी तुपाचा दिवा लावा आणि कमलगट्टाची माळ घेऊन ओम महालक्ष्मीय नमः चा जप करा.
4. संकटांनावर मात करण्यासाठी होळीतील सुकलेले नारळ आणि तांब्याचे पैसे हे घर आणि दुकानाच्या चारही कोपऱ्यातून सात वेळा फिरवा.
5. नजर लागू नये म्हणून तुपात भिजवलेल्या पाच लवंगा, एक बताशा, एक सुपारी होळीमध्ये दहन करा.
6. धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी होळीचे भस्म अंगाला लावून आंघोळ करा.
7. लहान मुलांना काही त्रास होतं असेल किंवा ते बोलतं नसेल तर सुका कांदा, लसूण आणि हिरवे लिंबू होळीमध्ये अपर्ण करा.
8. तुमचे पैसे कोणी देत नसेल तर होलिका दहन स्थळावर डाळिंबाच्या लाकडाने त्रिकोणाच्या आत त्या व्यक्तीचं नाव लिहा आणि त्यावर हिरवा रंग शिंपडा.
9. पैसा हातात टिकत नसेल तर होळीच्या दिवशी 5 पैसे लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)