मुंबई : 2017ला निरोप देत 2018चे स्वागत करण्यासाठी काही तासांचाच अवधी बाकी आहे. अशा स्थितीत नव्या सालाबाबत अनेकांनी संकल्प करण्यास सुरूवात केली आहे. आपल्या संकल्पाला 'अर्थ'पूर्णता लाभावी यासाठी आम्ही काही संकेत आपणास देऊ इच्छितो. म्हणूनच जाणून घ्या कसे राहिल वर्ष 2018, कोणाला होईल लक्ष्मीचा लाभ.
मेष - नशीब काढाल. कामात इतकी प्रगती होईल की, विकास आणि बरकत दोन्हीच्या संधी मिळतील. कामाच्या जीवावर प्रगतीची मुसांडी माराल.
वृषभ - व्यवहार करताना सांभाळा. अपघात होण्याची शक्यता. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक तोटा वाढण्याची शक्यता. पण, योग्य आणि सावधपणे केलेली गुंतवणूक अडथळ्यांवर मात करून, फायदा देईल.
मिथून - जोडीदाराकडे लक्ष द्या. त्याच्याशी संघर्ष टाळा. वाद तुटेल इतके ताणू नका. अन्यथा मोठे नुकसान संभवते. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. पण, आर्थिक लाभासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
कर्क - तुम्हाला काहीच प्रयत्न करावे लागणार नाहीत. शत्रू स्वत: गारद होतील. शारीरिक समस्यांकडे लक्ष द्या. कायदेशीर प्रकरण, कोर्ट-कचेऱ्या यात अडकू नका. अन्यथा मोठा खर्च संभवतो. शरीराला जपल्यास आर्थिक वृद्धी संभवते.
सिंह - यंदाचे साल यशस्वी होण्यासाठीच आहे. प्रेम, अपत्ये, ज्येष्ठ मंडळींसाठी जोडीदाराला विशेष आर्थिक प्राप्ती होईल. तरूणाईने नवनव्या गोष्टी शिकण्यावर भर द्यावा. त्यातून आर्थिक लाभ संभवतो.
कन्या - कौटूंबिक वादविवाद वाढण्याची शक्यता. आरोग्याचे प्रश्न त्रास देतील. पण, आर्थिक स्थिती स्थिर राहील. नव्या घरात जाण्याचे योग.
तूळ - सहकारी, नातेवाईक यांच्याशी प्रेमाणे वागा. आत्मविश्वास वाढेल. आत्मविश्वासाने केलेल्या कामात अर्थप्राप्तिचे योग.
वृश्चिक - आर्थिक तोट्याची चिन्हे, सुख वाढेल. संसारीक संबंधात ताणतणाव वाढण्याची चिन्हे.
धनु - मानसिक आरोग्य बिघडेल. मन स्थिर ठेवा. अफवांवर विश्वास ठेऊ नका. फायद्यात राहाल.
मकर - अनैतिक संबंध प्रस्तापीत होण्याचा संभव. त्यातून खर्च वाढण्याची शक्यता. वर्तनावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक उन्नती.
कुंभ - कमाईचे वर्ष. व्यवसाय, नोकरी यात लाभा होण्याचे योग. कुटुंबातील आर्थिक आवकही वाढण्यीच शक्यता.
मीन - माता-पित्यांच्या त्रासामुळे व्याकूळता येण्याची शक्यता. संपत्ती स्थिर राहण्याची चिन्हे. वाद-विवाद कौटुंबिक उलथापालत वाढण्याची चिन्हे.