Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना चांगला असेल सोमवार

असा असेल आजचा दिवस 

Updated: Jul 5, 2021, 06:29 AM IST
Horoscope : 'या' राशींच्या व्यक्तींना चांगला असेल सोमवार title=

मुंबई : ज्येष्ठ मंडळींच्या मार्गदर्शनानंतर तुमचं नशिब आज बदलणार आहे. चांगला सल्ला आज तुम्हाला बिझनेसमध्ये यश मिळवून देईल. याचा मोठा फायदा तुमच्या भविष्यावर होणार आहे. 

मेष : आज तुमचं भाग्य चांगल असणार आहे. आज मित्र परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. यावेळी कुणी नव्या योजना घेऊन येईल. आजचा पूर्ण दिवस उत्साहात असणार आहे. 

वृषभ : आजचा दिवस भाग्याचा आहे. मित्र परिवारासोबत चांगला वेळ घालवाल. आर्थिक स्थिती चांगली राहिल. 

मिथुन : आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींचा आदर करा. दिवसाची सुरूवात चांगली होईल. कामात चांगला फायदा होईल. धनलाभ होईल. 

कर्क - शत्रुंना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. बाहेर फिरण्याचा योग आहे. आज भाग्याची साथ मिळेल. स्वास्थ चांगल राहील. 

सिंह : सोमवारी कामात चांगल यश मिळेल. मेहनत आणि भाग्य याचा खूप चांगला मेळ बसेल. आर्थिक परिस्थिती चांगली राहिल. 

कन्या : चांगल्या व्यक्तींचा सहवास लाभेल. त्यांच्या मार्गदर्शनामुळे यश प्राप्त होईल. नवीन मित्र आयुष्यात खूप आनंद आणतील. 

तूळ : दिवसाची सुरूवात अतिशय चांगली होईल. हातात काम असेल. अच्छा लाभ प्राप्त होईल. 

वृश्चिक : आजचा दिवस कार्याचा असेल. नोकरीमध्ये सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल. मन प्रसन्न करणारा आजचा दिवस असेल. 

धनू : बुद्धिमता आणि चतुराईमुळे चांगल्या लोकांशी संवाद साधाला. वाणी मधुर ठेवा. घरात मंगल कार्य घडेल. 

मकर : आजचा दिवस सौम्य दिवस असेल. व्यवहार अतिशय सांभाळून करा. कामात लक्ष द्या. 

कुंभ : विनाकारण वाद होईल. आज शांत राहा. मौन तुमच्या कामी येईल. स्वास्थ चांगल राहिल. 

मीन : आजचा दिवस भाग्याचा आहे. कार्यात सहकर्मचाऱ्यांची मदत मिळेल.