मेष - आज कोणतंही काम टाळू नका. नोकरी, व्यवसायात पूर्ण लक्ष द्या. एकाग्रतेने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. नवीन लोकांशी ओळखी होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील काही व्यक्तींशी कामासंबंधी गोष्टी शेअर करु शकता. कुटुंबासोबत चांगला वेळ जाईल. कुटुंबाच्या मदतीने आर्थिक समस्या सुटू शकतील.
वृषभ - काही नवीन संधी मिळू शकतात. तुमच्या योजना सफल होऊ शकतात. व्यवसायात यश मिळू शकते. नशिबाची साथ मिळेल. सकारात्मक राहा. जोडीदाराप्रती तुमची जबाबदारी वाढू शकते. शांत राहा. नवीन लोकांच्या ओळखीतून यश मिळेल.
मिथुन - नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. विचार केलेली कामं पूर्ण कराल. एखाद्या खास कामाची सुरुवात करु शकता. उत्साही राहाल. यश मिळेल. जुन्या योजनांवर पुन्हा काम करण्याची सुरुवात करु शकता. तुमच्या कामाकडे लक्ष द्या. मनात असेल त्याच गोष्टी कराल.
कर्क - आधी केलेल्या कामांचा फायदा होईल. मित्रांची अचानक मदत मिळू शकते. धार्मिक यात्रेची योजना आखू शकता. महत्त्वाची कामं आज पूर्ण करा. दिवस शांततेत जाईल. प्रत्येक प्रयत्नांत जोडीदाराची मदत मिळेल.
सिंह - तुमच्या बुद्धीने सर्व गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न कराल. पुढे जाण्याच्या संधी मिळतील. हाती असलेलं काम पूर्ण करा. नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
कन्या - पुढे जाण्याच्या नव्या संधी मिळतील. तुमच्या मताशी इतर लोक सहमत असतील. कुटुंबामधील एखाद्या निर्णयावर तुमचे मत स्पष्टपणे मांडा. विवाह प्रस्ताव येऊ शकतात.
तुळ - व्यस्त राहाल. शांततेने काम करा. दुसऱ्यांचे म्हणणे गंभीरतेने ऐका. जोडीदाराशी तुमच्या मनातील गोष्ट बोलू शकता. कागदोपत्री कामांकडे लक्ष द्या. काम पूर्ण होत गेल्याने उत्साही राहाल. जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे.
वृश्चिक - समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. त्यात यश मिळेल. जुन्या गोष्टी मागे सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. सकारात्मक राहाल. पैशांच्या बाबतीत फायदा होण्याची शक्यता आहे.
धनु - कामात मित्रांची मदत मिळेल. महत्त्वपूर्ण कामांत इतरांशी बोलण्याची संधी मिळू शकते. त्याचा फायदा होईल. मित्रांसोबत वेळ घालवू शकता. जोडीदाराची साथ मिळेल. चांगलं बोलून तुमची कामं पूर्ण करु शकता.
मकर - दिवस चांगला आहे. समस्या सोडवल्या जाण्याची शक्यता आहे. यश मिळेल. पैशांच्या बाबतीत गंभीरतेने विचार करा. कोणतंही काम विचार करुनच करा. जुन्या गोष्टींमध्ये रमाल.
कुंभ - महत्त्वपूर्ण व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. समजदारीने काम करा. ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. कुटुंबाची साथ मिळेल.
मीन - कामं पूर्ण होण्याची शक्यता आहे. फायदा होऊ शकतो. मित्रांसोबत एखादी योजना आखू शकता. पैशांच्या बाबतील सुधारणा होण्याची शक्यता आहे. काही गोष्टींमध्ये अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेऊनच काम करा. तुमच्या प्रश्नांची आपोआप उत्तरं मिळतील.