Weekly Tarot Horoscope Prediction 2 to 8 september 2024 in Marathi : सप्टेंबरचा पहिला आठवड्याची सुरुवात श्रावणी सोमवार आणि सोमवती अमावस्येने झाली आहे. त्यात बुध सिंह राशीत गोचर करणार आहे. सिंह राशीत आधीपासून सूर्यदेव विराजमान आहे. त्यामुळे इथे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. तर हा आठवडा काहींसाठी कष्टाचा तर काहींसाठी आनंदाचा असणार आहे चला तर जाणून घेऊयात 12 राशींसाठी कसा असेल सप्टेंबरचा पहिला आठवडा टॅरो कार्ड रीडर कविता ओझा यांच्याकडून
सप्टेंबरचा पहिला आठवडा मेष राशीच्या लोकांसाठी खूप चांगला सिद्ध होणार आहे. या आठवड्यात नोकरदार लोकांच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग उघडणार आहे. तुम्ही सध्या जे काही करत आहात आणि तुम्ही करत असलेले संपर्क भविष्यात फायदेशीर ठरणार आहे. मात्र आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. तुमच्या जोडीदाराला तुमची गरज भासणार आहे.
सप्टेंबरचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी प्रगतीच्या संधी घेऊन आलाय. या आठवड्यात तुमची कामाची वागणूकही चांगली असणार आहे. एवढंच नाही तर स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे. साहित्य आणि संगीतातही तुमची आवड निर्माण होणार आहे. मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. प्रलंबित कामं पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.
सप्टेंबरचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी लाभ आणि प्रगतीच्या संधी घेऊन आला आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या सर्व क्षमता आणि एकाग्रतेने यशासाठी प्रयत्न करणार आहात. या आठवड्यात तुमचा प्रभाव, करिष्मा आणि सर्जनशील प्रवृत्ती शिखरावर असणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची अभ्यासाची आवड वाढणार आहे. प्रेमसंबंध अधिक घट्ट होणार आहे.
सप्टेंबरचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी संदिग्धतेने भरलेला असणार आहे. काय करावे हे स्पष्ट होणार नाही कारण एकाच वेळी अनेक प्रकारचे विचार मनात असणार आहे. अनावश्यक खर्चाकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रवासाचे योग आहेत.
सप्टेंबरचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी खूप यशस्वी असणार आहे. स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे. साहित्य-संगीताची आवड वाढणार आहे. मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. प्रलंबित कामे पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.
सप्टेंबरचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी थोडा कठीण असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर केल्यास उत्तम होईल. आपण तिच्याबद्दल विचार करत नाही असे तिला कधीही वाटू देऊ नका तुम्हाला बीपीची समस्या जाणवू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.
सप्टेंबरचा पहिला आठवडा तूळ राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. या आठवड्यात तुमची मुलांबद्दलची आवड वाढणार आहे. व्यवसायात नवीन करार होणार आहेत. कायदेशीर बाबींमध्ये निष्काळजी राहू नका. प्रयत्न आणि सहकार्यामुळे अनुकूलता प्राप्त होणार आहे. नवीन संबंध फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक योजना राबवल्या जाणार आहे. नवीन काम मिळण्याची शक्यता आहे.
या आठवड्यात या राशीच्या लोकांचे वर्तन थोडे आक्रमक असणार आहे. तसंच या आठवड्यात वैवाहिक जीवनात काहीतरी आंबट आणि काहीतरी गोड अनुभव तुम्हाला येणार आहे. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागणार आहे. गुरुवारी, नातेसंबंध, संधी आणि विरोध एकाच वेळी तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे.
सप्टेंबरचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी मोठा यश देणारा असणार आहे. या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धांमध्ये यश मिळणार आहे. मालमत्ता, घर आणि कौटुंबिक बाबतीत तुम्ही नवीन सुरुवात करणार आहात. प्रलंबित कामं पूर्ण होण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे.
मकर राशीच्या लोकांनी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाहेर जाण्यापूर्वी त्यांच्या घराच्या सुरक्षेसाठी पुरेशी व्यवस्था करावी लागणार आहे. कुटुंबातील कोणाशी तरी वाद होण्याची शक्यता आहे. प्रेम व्यक्त करण्यात घाई करू नका, हे शक्य आहे की तुम्ही ज्या भावनांना प्रेम समजता त्या फक्त आकर्षण असू शकतं. आर्थिक स्थिती समाधानकारक राहणार आहात.
या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबरचा पहिला आठवडा फारसा अनुकूल नसणार आहे. म्हणून, स्वतःला मर्यादित ठेवा, जास्त पसरू नका आणि कोणतीही निर्णय घेऊ नका. सहकारी आणि मित्रांसोबत सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणे हिताच ठरेल. हा आठवडा तुमच्या आरोग्यासाठी चांगला नसणार आहे. जागा बदलण्याची शक्यता आहे.
सप्टेंबरचा पहिला आठवडा या राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार आहे. नोकरदारांना अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे खूप फायदा होणार आहे. तसंच, तुम्ही सध्या काय करत आहात आणि तुम्ही करत असलेल्या संपर्कांमुळे तुम्हाला लवकरच फायदा होणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या, त्याला तुमची गरज भासणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)