'आधी कुस्ती आणि आता काँग्रेसचा सत्यानाश', निवडणुकीत विनेश फोगटच्या विजयावर बृजभूषण सिंहची पहिली प्रतिक्रिया

हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट हिला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते.  विनेशच्या विजयानंतर आता माजी खासदार बृजभूषण शरण सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 8, 2024, 08:32 PM IST
'आधी कुस्ती आणि आता काँग्रेसचा सत्यानाश', निवडणुकीत विनेश फोगटच्या विजयावर बृजभूषण सिंहची पहिली प्रतिक्रिया  title=
(Photo Credit : Social Media)

Brij Bhushan Sharan Singh On Vinesh Phogat : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल 8 ऑक्टोबर रोजी जाहीर झाले असून यात काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणारी कुस्तीपटू विनेश फोगट हिचा विजय झाला आहे. हरियाणाच्या जींद जिल्ह्यातील जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट हिला विधानसभेसाठी आमदारकीचे तिकीट दिले होते.  विनेशच्या विजयानंतर आता माजी खासदार बृजभूषण शरण सिंहने प्रतिक्रिया दिली आहे. 

काय म्हणाला बृजभूषण शरण सिंह? 

हरियाणा विधानसभा निवडणुकीत विनेशचा विजय झाल्यावर बृजभूषण शरण सिंहने तिखट प्रतिक्रिया दिली. बृजभूषण म्हणाला, 'ज्या प्रकारे शेतकऱ्यांच्या नावावर, कुस्तीपटूंच्या नावावर लोकांना भुमीत करण्याचा प्रयत्न केला गेला, त्याला जनतेने नाकारले'. विनेश फोगाट विषयी ते म्हणाले कि 'जरी विनेश निवडणुकीत जिंकली असेल तरी काँग्रेसचा सत्यानाश झाला आहे'.

पत्रकारांनी बृजभूषण शरण सिंहला विचारले की काँग्रेसचा सत्यानाश कोणामुळे झाला? यावर त्याने विनेशकडे इशारा केला. त्याने म्हंटले की, 'तिचं (विनेश) काय आहे ती तर विजयी होईलच. ती इथे (रेसलिंग) सुद्धा बेईमानी करून जिंकायची आणि आता निवडणुकीतही जिंकली. पण तिला जिंकवण्यात काँग्रेस पार्टी पराभूत राज्यात झाली. निवडणुकीत जिंकणारे हे कुस्तीपटू नायक नाहीत तर खलनायक आहेत. पहिले त्यांनी २ वर्ष कुस्तीचा सत्यानाश केला आणि आता काँग्रेसचा सत्यानाश केला आहे. 

हेही वाचा : IND VS BAN T20 : टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये होणार मोठा बदल, दिल्लीमध्ये 'लोकल बॉय' करणार डेब्यू?

 

कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह याच्यावर गेल्यावर्षी जूनियल महिला कुस्तीपटुंवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हा बृजभूषण शरण सिंह यांना यापदावरून काढून टाकण्यात यावे तसेच त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी कुस्तीपटूंनी दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन केले. कुस्तीपटूंच्या आंदोलनात विनेश फोगट सह ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक इत्यादींचाही सहभाग होता. 

विनेशला किती मतं मिळाली?

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटनुसार जुलाना मतदारसंघाची 15 पैकी 15 फेऱ्यांची मतमोजणी झाली असून यात काँग्रेसची उमेदवार विनेश फोगाटला 64491 मतं मिळाली आहेत. तिच्या मतांची टक्केवारी 46.77 इतकी होती. तर प्रतिस्पर्धी भाजप उमेदवार योगेश कुमार यांना 58728 इतकी मते मिळाली, त्यांच्या मतांची टक्केवारी 42.59 इतकी होती.

कोणा विरुद्ध होती विनेशची लढत?

जुलाना येथून काँग्रेसने विनेश फोगट तर भाजपने योगेश कुमार यांना तिकीट दिले होते. तर आम आदमी पार्टीकडून कविता राणी ही निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार विनेशचा जवळपास 5 हजार मतांची लीडने विजय झाला असून दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे योगेश कुमार होते.