Ranji Trophy Plate 2024-25 Agni Chopra: रणजी ट्रॉफीच्या प्रत्येक सिजनमध्ये असे अनेक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, जे त्यांच्या बॉल किंवा बॅटने अशी छाप पडतात की ते वर्षानुवर्षे लक्षात राहतात. यावेळी, रणजी ट्रॉफी प्लेट 2024-25 मध्ये मिझोरामकडून खेळत असलेल्या अग्नि चोप्राने सलग दोन द्विशतके झळकावून टीम इंडियाचे दार ठोठावले आहे. चित्रपट निर्माता विधू विनोद चोप्रा यांचा अग्नि चोप्रा हा मुलगा आहे. अग्निने रणजीमध्ये एकापाठोपाठ एक द्विशतक झळकावले आहे. त्याने डॉन ब्रॅडमनचा विक्रमही मोडला. गेल्या तीन सामन्यांवर नजर टाकली तर अग्निने धावा केल्या आहेत. अग्नी आता निवडकर्त्यांच्या रडारवर असेल हे नक्की.
अग्नि चोप्राने आपल्या फलंदाजीने मणिपूर संघाचा धुव्वा उडवला. त्याने पहिल्या डावात 218 चेंडूत 269 धावांची शानदार खेळी केली. यापूर्वी त्याला अहमदाबादच्या टीमचा धुव्वा उडवला उडवला होता. त्यादरम्यान केवळ 110 चेंडूत 238 धावा केल्या होत्या. जर आपण मागील 3 सामन्यांवर नजर टाकली तर, अग्निने 100+ धावा केल्या आहेत. सिक्कीमविरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात अग्निने अर्धशतक झळकावले होते. त्याने 51 धावा केल्या. त्यानंतर अरुणाचलविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अग्नीने प्रथम फलंदाजी करत शतक झळकावले आणि त्यानंतर द्विशतक झळकावले. अरुणाचल विरुद्धच्या सामन्यात मिझोरामच्या या फलंदाजाने प्रथम ११० आणि २३८* धावांची इनिंग खेळली.
अग्नि चोप्राने यापूर्वी मुंबईसाठी अंडर-19 आणि अंडर-23 क्रिकेट खेळले आहे. पण काही काळानंतर त्याने मिझोराममध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. यानंतर या खेळाडूने बॅटने खळबळ उडवून दिली.
Agni Dev Chopra – the RUN MACHINE! He's smashing it with 170 off 203 balls on Day 1 in the #MIZvMAN game! That’s 3 consecutive tons now after his 110 and epic 238 against Arunachal in Ahmedabad! With 8 centuries in 9 matches, a double ton, and three 150+ scores,… pic.twitter.com/cw6nTeWZDQ
— lightningspeed (@lightningspeedk) October 26, 2024
अग्निचा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील प्रवेश दमदार ठरला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये डॉन ब्रॅडमनही करू शकले नाहीत, अशी कामगिरी त्यांनी केली. अग्निने प्रथम श्रेणीच्या पहिल्या सलग 4 सामन्यांमध्ये शतकी खेळी खेळली. त्याचे आतापर्यंतचे आकडे पहा, त्याने 9 सामन्यांच्या 17 डावात 1585 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने 8 शतकी खेळी खेळली आहेत.