Hardik Pandya: शनिवारी आयपीएलमध्ये (IPL 2023) कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरूद्ध गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्या सामना रंगला होता. गेल्या सिझनप्रमाणे या सिझनमध्येही गुजरातच्या टीमची कामगिरी चांगली होताना दिसतेय. केकेआरविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दरम्यान या सामन्यात पुन्हा एकदा हार्दिक पंड्याचा एटिट्यूड दिसून आला. पंड्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होताना दिसतोय.
पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकात्याची सुरुवात चांगली झाली होती. कोलकात्याकडून रहमानुल्लाह गुरबाजने तुफान फलंदाजी करत डावाची सुरुवात चांगली करून दिली. गुरबाजने कालच्या सामन्यात 39 बॉल्समध्ये 81 रन्सची खेळी केली. यावेळी गुरबाजने त्याच्या या खेळीमध्ये 7 सिक्स आणि 5 फोर लगावले. मात्र यावेळी गुजरातचा कर्णधार हार्दिक पंड्याशी भर मैदानात गुरबाजचा झालेला वाद चांगलाच चर्चेत राहिला.
कोलकाता फलंदाजी करत असताना हार्दिक पंड्याने गोलंदाजीची जबाबदारी स्विकारली होती. यावेळी बॉल टाकण्यासाठी तो रनअप कडे जात असतानाच गुरबाजने त्याला थांबवलं आणि काहीतरी सांगितलं. दरम्यान यानंतर हार्दिकचा मूड अचानक बदलला आणि रनअप कडे जात असताना तो संतापलेला दिसला. यावेळी हार्दिक गुरबाजला रागाच्या भरात काहीतरी सांगत असल्याचं देखील समोर आलं.
हार्दिक आणि गुरजाब यांच्या व्हायरल झालेल्या या व्हिडीओच्या माध्यामातून दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचं चित्र नक्की आहे. दरम्यान सामन्यादरम्यान खेळाडूंवर चिडणं किंवा संतापणं हे हार्दिक पंड्याकडून पहिल्यांदा घडलेलं नाही. यापूर्वीही हार्दिकचे अनेक संपालेले व्हिडीओ समोर आले आहेत.
— CricDekho (@Hanji_CricDekho) April 29, 2023
शनिवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सने कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव केला. या विजयामुळे गुजरातची टीम पॉईंट्स टेबलवर अव्वल स्थानावर पोहोचली आहे. कोलकात्याने प्रथम फलंदाजी करत 179 रन्स केले. या टार्गेटचा पाठलाग करताना गुजरातचा ओपनर शुभमन गिलने चांगली खेळी केली. अखेरीस विजय शंकरने 24 बॉल्समध्ये 51 रन्सची तुफान खेळी करत गुजरातला 7 विकेट्सने विजय मिळवून दिला.