IND vs AUS: इंदूर टेस्टनंतर ICC चा भारताला मोठा झटका; 'या' कारणासाठी दिले डिमेरिट पॉईंट्स

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आलेला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सामना तिसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्स राखून पराभव केलाय. आयसीसीने दिलेल्या खराब रेटिंगमुळे इंदूरच्या होळकर स्टेडियमला 3 डिमेरिट्स पॉइंट देण्यात आले आहेत.

Updated: Mar 3, 2023, 11:05 PM IST
IND vs AUS: इंदूर टेस्टनंतर ICC चा भारताला मोठा झटका; 'या' कारणासाठी दिले डिमेरिट पॉईंट्स title=

Indore Holkar stadium Pitch: सध्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border–Gavaskar Trophy) भारतात सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीमच्या कामगिरीपेक्षा भारतातील पीचचा मुद्दा अधिक गाजलेला दिसतोय. या सिरीजमध्ये आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांमध्ये फलंदाजांसाठी फलंदाजी करणं फार कठीण काम असल्याचं दिसून आलं. तिसऱ्या टेस्टचा रिझल्ट हा हा पहिल्या दोन टेस्टप्रमाणे तिसऱ्या दिवशीच लागला. दरम्यान यानंतर ICC ने इंदूरच्या पीचवरून कडक कारवाई केलीये. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी वापरण्यात आलेल्या होळकर स्टेडियमच्या खेळपट्टीला 'खराब' असा करार दिला आहे.

ICC ने ठोठावला दंड

इंदूरच्या होळकर स्टेडियमवर खेळवण्यात आलेला भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील टेस्ट सामना तिसऱ्या दिवशी संपला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्स राखून पराभव केलाय. आयसीसीने दिलेल्या खराब रेटिंगमुळे इंदूरच्या होळकर स्टेडियमला 3 डिमेरिट्स पॉइंट देण्यात आले आहेत. मुख्य म्हणजे पुढील पाच वर्ष एक्विव्ह राहणार आहेत.

आयसीसीने जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार, "मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी आयसीसीला त्यांचा अहवाल सादर केलाय. या अहवालामध्ये त्यांनी सामना अधिकारी आणि दोन्ही टीमच्या कर्णधारांशी चर्चा केल्यानंतर चिंता व्यक्त केली. त्यांनी केलेल्या तपासणीनंतर इंदूरच्या होळकर स्टेडियमला ​​3 डिमेरिट पॉइंट देण्यात आलेत. हा अहवाल बीसीसीआयला पाठवण्यात आला असून या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी बीसीसीआयकडे 14 दिवसांचा कालावधी आहे.

मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांनी सांगितलं की, “होळकर स्टेडियमची खेळपट्टी खूप कोरडी होती. या कारणाने त्यामुळे बॅट आणि बॉलमध्ये समतोल राखला जात नव्हता. यामुळेच सुरुवातीपासूनच या पीचवर स्पिनर्सना मदत मिळाली. इतकंच नाही तर टीम इंडियाने पहिल्या इनिंगमध्ये 7 विकेट गमावल्या. पहिल्या सेशनच्या अर्ध्या तासात बॉल 'स्क्वेअर टर्न' घेत होता."

तिसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय

तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. (IND vs AUS 3rd Test) या कसोटी विजयासह ऑस्ट्रेलिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी पात्र ठरला आहे. (Test Cricket News) दरम्यान, चार सामन्यांच्या बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत टीम इंडियाने 2 -1 अशी आघाडी कायम ठेवली आहे. या विजयामुळे चौथ्या कसोटीत चुसर निर्माण होण्याची शक्यता आहे. आता कांगारुंसाठीही ही कसोटी मालिका 2 -2 अशी बरोबरी करण्याची संधी आहे. तर टीम इंडिया चौथा सामना जिंकून मालिका जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे. 

इंदूरमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी अवघ्या 76 धावांचे टार्गेट ठेवण्यात आले होते. ऑस्ट्रेलियाने केवळ एक गडी गमावून सहज गाठले. इंदूरमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी टीम इंडिया अपयशी ठरली आहे. रोहित टीमचे सर्व 'प्लानिंग' फोल ठरले चौथा आणि शेवटचा कसोटी सामना 9 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.