नवी दिल्ली : न्यूझीलंडमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ क्रिकेट वर्ल्ड कपमधील ग्रुप सीमध्ये झालेल्या एका मॅचमध्ये अजबच प्रकार पहायला मिळाला.
या मॅचमध्ये इंग्लंडच्या टीम विरोधात खेळताना कॅनडाच्या टीमचा लाजीरवाणा पराभव झाला आहे.
इंग्लंडच्या टीमने प्रथम बॅटिंग करताना ५० ओव्हर्समध्ये ७ विकेट्स गमावत ३८३ रन्स बनवले. इंग्लंडच्या टीमने दिलेलं आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेली कॅनडाची टीम ३१.५ ओव्हर्समध्येच गारद झाली.
इंग्लंडच्या टीमने केलेल्या जबरदस्त बॉलिंगसमोर कॅनडाच्या बॅट्समनची एकही चालली नाही. ३१.५ ओव्हर्समध्ये १०१ रन्स करुन संपूर्ण कॅनडा टीम ऑल आऊट झाली. त्यामुळे इंग्लंडच्या टीमने २८२ रन्सने कॅनडावर दणदणीत विजय मिळवला आहे.
इंग्लंडच्या टीमकडून ओपनर बॅट्समन लियाम बॅक्सने ११४ बॉल्सवर १२० रन्सची इनिंग खेळली. तर, विल जॅक्सने ८२ बॉल्समध्ये १०२ रन्सची तुफानी बॅटिंग केली. बॅक्सने आपल्या इनिंगमध्ये १२ फोर आणि एक सिक्सर लगावला. तर, जॅक्सने ११ फोर लगावले. बॅक्स आणि जॅक्स यांनी दुसऱ्या विकेटसाठी १८६ रन्सची पार्टनरशीप केली त्यामुळे टीमचा स्कोअर २८२ रन्सपर्यंत पोहोचला.
इंग्लंडच्या बॅट्सनने केलेल्या जबरदस्त बॉलिंगमुळे कॅनडाचे ५ बॅट्समनला खातंही उघडता आलं नाही. रंधीर संधू, आकाश गिल, केविल सिंह, टियान प्रिटोरियस आणि रिशिव जोशी हे बॅट्समन शून्यावर आऊट झाले. प्रेम सिसोदियाने तीन, अॅडम फिंच, रोमन वालकर आणि ल्यूक हॉलमॅन यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतले.