ICC World Test Championship Final 2023 : आयसीसीने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्याची (World Test Championship Final Dates) तारीख जाहीर केलीये. इंग्लंडच्या ओव्हल (Oval, London) मैदानावर 7 ते 11 जून दरम्यान हा खेळवला जाईल. या सामन्यात 12 जून हा दिवस राखीव (Reserve Day) म्हणून ठेवण्यात आलाय. पावसानं व्यत्यय आणल्यास या दिवशी देखील सामना खेळवला जाईल. त्यामुळे आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (ICC World Test Championship final 2023 will be played at The Oval London from 7 to 11 June with a reserve day)
टीम इंडियाला (Team India) जर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर बॉर्डर गावस्कर (Border Gavaskar Trophy) मालिका जिंकणं अतिशय महत्वाचं आहे. भारतीय संघाने जर ही मालिका ४-० ने जिंकली तर, भारतीय संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करेल. काहीही करून टीम इंडियाला ही मालिका कमीतकमी 3-0 ने जिंकावी लागेल. नाहीतर भारताच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
Mark your calendars
The dates for the ICC World Test Championship Final later this year have been revealed #WTC23https://t.co/gOJcoWVc58
— ICC (@ICC) February 8, 2023
दरम्यान, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम (ICC World Test Championship final ) फेरीत पोहोचण्याच्या शर्यतीत ऑस्ट्रेलिया (Austrelia) आणि भारत (India) आघाडीवर आहेत. सध्या रँकिंगमध्ये (Test Ranking) ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आता फायनलच्या सामन्यात कोणते दोन संघ खेळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.
दरम्यान, न्यूझीलंडने 2021 मध्ये साउथेम्प्टन येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून कसोटीचा विश्वविजेता होण्याचा मान मिळवला होता. त्यानंतर आता कोणता संघ पुन्हा वर्ल्ड कप जिंकणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.